image-call
image-whatsapp

जय भवानी निवासी अपंग मतिमंद विद्यालय, पलुस

जय भवानी निवासी अपंग मतिमंद विद्यालय, पलूस ही संस्था सन २०१४ मध्ये स्थापन झाली असून तिला सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, समाज कल्याण विभाग व जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय सांगली यांची मान्यता आहे. ही शाळा अनुदान तत्वावर कार्यरत असून तिचे उद्दिष्ट बौद्धिक अपंग विद्यार्थ्यांना स्वावलंबी, आत्मविश्वासी आणि समाजाभिमुख बनवणे आहे. विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसार त्यांना विविध व्यावसायिक, शैक्षणिक आणि सामाजिक प्रशिक्षण दिले जाते, ज्यामुळे त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते.

शाळेत विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविणे, समाजाशी संवाद साधण्याची सवय लावणे आणि पालकांचा सहभाग वाढवून घरगुती पातळीवर पूरक वातावरण तयार करणे यावर भर दिला जातो. अशा प्रकारे ही विद्यालय विशेष गरज असलेल्या व्यक्तींसाठी आत्मनिर्भरता आणि सन्मानाचे जीवन जगण्याचे माध्यम ठरते. दिव्यांग विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवून त्यांना व्यवसायिक कौशल्य शिकवली जातात जेणेकरून आई-वडिलांच्या नंतर स्वतःचा उदरनिर्वाह करून छोटासा व्यवसाय करू शकतील एवढे शिक्षण दिले जाते.

पुढे वाचा
about-us

शाळेमध्ये मतिमंद मुला-मुलींना शिक्षण, निवास व भोजनाची सर्व सुविधा पूर्णपणे विनामूल्य दिल्या जातात.

आमची वैशिष्ठे

  • उच्चशिक्षित,तज्ञ व अनुभवी अध्यापक वृंद
  • विध्यार्थी शिक्षक प्रमाण ८:१
  • प्रत्येक वर्गात जास्तीत जास्त ८ विध्यार्थी
  • योगासन व प्राणायम प्रशिक्षण
  • मुलांचा आवडी व रुचिनुसार विविध हस्त कलांचे प्रशिक्षण
  • स्वावलंबनाचे व व्यवसायपूर्ण कौशल्याचे प्रशिक्षण
  • मुलांमध्ये असलेल्या संस्कृतिक कला गुणांना वाव देवून विकास करणे
  • पारंपरिक व आधुनिक खेळांचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण
  • आपत्कालीन व्यवस्थापणाचे प्रशिक्षण
  • पूर्णवेळ कार्यरत समुपदेशक
  • पोषक व संतुलित आहार
  • अत्याधुनिक उपकरणानी व वैविध्यपूर्ण खेळण्यांनी सजलेले
  • अध्यावत एक्टिविटी सेंटर
  • मुला-मुलींसाठी स्वतंत्र वस्तीगृह व संडास-बाथरूमची सोय
  • आंघोळीसाठी गरम पाणी
  • वाय-फाय कॅम्पस
  • ऑनलाइन सी.सी.टी.वी कॅमेरा व स्पीकर
  • मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी मनोसोपचार तज्ञ
  • स्पीच थेरपी विशेष प्रशिक्षण
  • मुलांच्या औषध उपचारांसाठी नर्स
  • मुलांची काळजी घेण्यासाठी काळजी वाहक

पुरस्कार आणि प्रमाणपत्रे

आम्हाला का निवडाल ?

शाळेत शिक्षण, निवास, भोजन, आरोग्य तपासणी, व्यावसायिक प्रशिक्षण आणि विविध उपक्रम पूर्णपणे विनामूल्य उपलब्ध आहेत.

विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेनुसार तज्ञांकडून तपासणी केली जाते आणि आवश्यक कागदपत्रांसह प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली जाते.

शाळेत सुरक्षित, स्वच्छ आणि निगा राखलेली निवासी व्यवस्था उपलब्ध आहे, ज्यामध्ये मुला-मुलींसाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाते.

भाषा, गणित, स्वावलंबन, दैनंदिन कौशल्ये, वर्तन विकास, क्रीडा, सांस्कृतिक उपक्रम तसेच व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते.

होय, विद्यार्थ्यांचे नियमित आरोग्य तपासणी तज्ज्ञ डॉक्टरांकडून केली जाते आणि आवश्यकतेनुसार उपचार व मार्गदर्शन दिले जाते.

विद्यार्थ्यांच्या प्रगतीबाबत पालकांना नियमित माहिती दिली जाते तसेच पालक-शिक्षक बैठकीद्वारे त्यांच्या शंकांचे निरसन केले जाते.
  • विनामूल्य शिक्षण, निवास व भोजन.
  • वैयक्तिक क्षमतेनुसार विशेष शिक्षण.
  • सुरक्षित व स्वच्छ निवासी व्यवस्था.
  • नियमित वैद्यकीय तपासणी.
  • सांस्कृतिक व क्रीडा उपक्रमांची सुविधा.

शालेय उपक्रम

images-project

आधिक फोटो

आषाढी एकादशी दिंडी सोहळा

images-project

आधिक फोटो

योगा दिन साजरा करण्यात आला

images-project

आधिक फोटो

रक्षाबंधन उत्साहात साजरी करण्यात आली

images-project

आधिक फोटो

जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत सहभाग

images-project

आधिक फोटो

रांगोळी तयार करण्याचा उपक्रम

images-project

आधिक फोटो

मकर संक्रांती तिळगुळ घ्या गोड बोला...

images-project

आधिक फोटो

15 ऑगस्ट दिन साजरा करण्यात आला

images-project

आधिक फोटो

यहा के हम सिकंदर या स्पर्धेत सहभाग

शालेय समित्या

विशेष मुलांच्या प्रवेशासाठी माहिती हवी आहे का ? आम्हाला आत्ताच संपर्क करा किंवा आजच भेट ठरवा!